Director's Desk

yogesh darekar sir

Education is best weapon to change your future.

या सिद्धांतांवर सुमारे 11 वर्षांपूर्वी **Yashodeep Academy (YD क्लास)** ची स्थापना केली. माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षापासून शिकवायला सुरुवात केली. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी मला चांगल्या प्रकारे शिकवता आले. या अनुभवामुळे मला शिक्षण क्षेत्रात शिकवण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच आवडीला पुढे नेत **YD क्लास** ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला दहा ते पंधरा मुले सोबत घेऊन **YD क्लास** सुरू झाला. मित्रांकडून ७००० रुपये उसने घेऊन बोर्ड रूम भाड्याने घेऊन क्लासचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीची चार वर्षे थोडी कठीणच गेली. पैशाच्या कमतरतेमुळे मुलांना चांगल्या सुविधा देता येत नव्हत्या, पण ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गातील सामान्य कुटुंबातील मुलांना कमीत कमी फीमध्ये चांगले शिक्षण देत आलो.

आज सांगताना आनंद होतो की **YD क्लास** ने आतापर्यंत ७००० पेक्षा जास्त विद्यार्थी घडवले, त्यात २५०० पेक्षा जास्त इंजिनिअर आणि १०० पेक्षा जास्त डॉक्टर आम्ही घडवले.

आळंदी म्हटलं की ग्रामीण भाग, येथे वारकरी संप्रदाय शिकण्यासाठी भरपूर लोक येत असतात. त्यातील बरीच मुले शेतमजूर व कामगारांची असतात. आम्ही वारकरी शिक्षणासोबत शैक्षणिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. जसे की ओमकार वाघ – शेतकरी कुटुंबातील एक सामान्य मुलगा – आज “Commercial Pilot” आहे.

एका सामान्य पालकाला एकापेक्षा जास्त मुलांचे शिक्षण करणे किती अवघड असते, हे आपल्याला माहिती आहे. पण **YD क्लास** च्या योग्य मार्गदर्शनामुळे काही मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि काही शिष्यवृत्तींचा लाभ घेऊन आतापर्यंत ५० पेक्षा जास्त Open Category च्या मुलांचे शिक्षण मोफत केले आहे. जिथे इंजिनिअरिंगचा खर्च सुमारे ८ लाख असतो, तिथे आम्ही चांगले मार्गदर्शन देऊन, त्यांना चांगले मार्क मिळवून देऊन तो खर्च १ लाखापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

या ११ वर्षांच्या काळात **YD क्लास** ने काही आश्चर्यकारक निकाल दिले आहेत. पुण्यातील नामांकित कॉलेज हुजूरपागा मधून १ला टॉपर, मॉडेल कॉलेजचा दुसरा टॉपर तसेच २०२१ मध्ये PCMC मध्ये MHT-CET चा १ला टॉपर **YD क्लास** ने दिला. ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE अशा स्पर्धात्मक परीक्षांबद्दल पूर्वी फारशी माहिती नव्हती, पण आम्ही त्या परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करून कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण दिले.

२०२२ मध्ये १०वी मध्ये खेड तालुक्यातील १ला टॉपर **YD क्लास** चाच होता. गेल्या ५ वर्षांपासून ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना **YD क्लास** कडून शिष्यवृत्ती दिली जाते. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम, लायब्ररी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक Study Material उपलब्ध करून दिले जाते.

आज **Yashodeep Academy** च्या दोन शाखा आहेत. हजार पेक्षा जास्त मुले **YD क्लास** मध्ये शिक्षण घेत आहेत. २५ पेक्षा जास्त शिक्षक व इतर कर्मचारी काम करत आहेत. आळंदीची ओळख संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने आहेच, पण त्याचप्रमाणे **आळंदीला Education Hub म्हणून ओळख मिळवून देणे** हा आमचा उद्देश आहे आणि याच दृष्टीने आम्ही भविष्यासाठी काम करत आहोत.